Indian Rupee All-Time Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरला; 86.20 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला

शनिवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 34 पैशांनी घसरून 86.20 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला.

Photo Credit- X

Indian Rupee All-Time Low: शनिवारी भारतीय रुपया 34 पैशांनी (Indian Rupee) घसरून 86.20 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. ही घसरण अनेक आर्थिक दबावांचा परिणाम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन अमेरिकन प्रशासनाच्या संभाव्य व्यापार धोरणांमुळे अमेरिकन डॉलरची (US dollar) मजबूती वाढली. परिणामी रुपयाच्या कमकुवतपणाचे हे मुख्य कारण असल्याचे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले. रुपयाच्या मूल्यातील या घसरणीचा परिणाम सामान्य लोकांवरही होईल कारण आयात केलेल्या वस्तू, विशेषतः पेट्रोलियम उत्पादने महाग होऊ शकतात. याशिवाय, परदेशात शिक्षण घेणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्यांचा खर्चही वाढेल.

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now