Mukesh Ambani's Prediction On Indian Economy: 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो; मुकेश अंबानी यांची भविष्यवाणी
भारताच्या 5,000 वर्षांच्या इतिहासातील पुढील 25 वर्षे सर्वात परिवर्तनाची असतील, असेही ते म्हणाले.
Mukesh Ambani's Prediction On Indian Economy: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत 2047 पर्यंत $40 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनू शकतो. हे उद्दिष्ट वास्तववादी आणि साध्य करण्यायोग्य आहे. कारण भारताला तरुण लोकसंख्या, परिपक्व लोकशाही आणि तंत्रज्ञानाच्या नव्या सामर्थ्याचा आशीर्वाद आहे, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. मुकेश अंबानी बुधवारी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त बोलत होते. भारताच्या 5,000 वर्षांच्या इतिहासातील पुढील 25 वर्षे सर्वात परिवर्तनाची असतील, असेही ते म्हणाले.
आरआयएलच्या भविष्याबाबत मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनी ‘वटवृक्षा’प्रमाणे वाढत राहील. त्याच्या फांद्या रुंद होतील आणि मुळे खोलवर होतील. या झाडाचे बीज पेरणारे आमचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे आम्ही कायम कृतज्ञतेने स्मरण करू. यावेळी अंबानी यांनी अनुक्रमे रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे प्रमुख असलेले त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)