Madhya Pradesh: इंदूरमध्ये दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध दोन मुलींनी घातला गोंधळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

इंदूरच्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत त्यांनी गोंधळ घातला. नशेत असलेल्या मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ प्रेक्षकांनी काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलींना ताब्यात घेतले.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध भांडण आणि गोंधळ घातल्याप्रकरणी दोन मुलींना अटक करण्यात आली आहे. दोन मुली रस्त्याच्या मधोमध भांडत होत्या आणि बाकीच्या दोन मुली त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होत्या. इंदूरच्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत त्यांनी गोंधळ घातला. नशेत असलेल्या मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ प्रेक्षकांनी काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलींनी पोलिस ठाण्यात तासभर गोंधळ सुरूच ठेवला. इंदूरमध्ये अशा घटना वाढत असून त्यांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा Bihar Police Lathi-Charge: बिहारच्या भावी शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now