दुसऱ्या धर्मातील व्यक्तीची हिंदू देवतेवर श्रद्धा असेल, तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश रोखता येणार नाही - मद्रास हायकोर्ट

जर दुसऱ्या धर्मातील व्यक्तीची एखाद्या विशिष्ट हिंदू देवतेवर श्रद्धा असेल, तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश रोखता येणार नाही, असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे.

Court Hammer | (Photo Credits-File Photo)

जर दुसऱ्या धर्मातील व्यक्तीची एखाद्या विशिष्ट हिंदू देवतेवर श्रद्धा असेल, तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश रोखता येणार नाही, असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि आर हेमलता यांच्या खंडपीठाने थिरुवत्तर येथील अरुलमिघु आदिकेसव पेरुमल थिरुकोविल यांच्या कुंभबिशेगम उत्सवात बिगर हिंदूंना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेत असा निकाल दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement