Hydrabad Shocker: AIMIM पक्षाचा कार्यकर्त्याची सात जणांनी मिळून केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

हैद्राबाद येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात हल्लेखोरांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

Hydrabad Crime

Hydrabad Shocker: हैद्राबाद येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात हल्लेखोरांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हैद्राबादमधील IS सदन पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी एकाला निर्घृणपणे मारल्याचे जवळच्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्लेखोरांनी ज्या पीडितेला निर्घृणपणे ठार मारले, ती हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचेही वृत्त आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना १० डिसेंबरच्या पहाटे झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement