Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय वादळ अवकाशातून कसं दिसतं? पहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादीने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओही त्याने आयएसएसवरून शूट केला आहे.

Biparjoy Cyclone Video (PC - Twitter/ @Astro_Alneyadi)

Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागला असून समुद्रात वादळी लाटा उसळू लागल्या आहेत. दरम्यान, अवकाशातून बिपरजॉयची भयानक छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी चक्रीवादळाचा व्हिडिओ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वरून जारी केला आहे. सुलतान अल नेयादीने टिपलेल्या या दृश्यांमध्ये अरबी समुद्रावर चक्रीवादळ दिसत आहे. जे अतिशय भीषण रूप धारण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादीने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओही त्याने आयएसएसवरून शूट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमधून वादळाचे दृश्य दाखवले आणि सर्व लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा - Cyclone Biparjoy Update: 'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार; तिन्ही सेना दल पूर्णपणे सज्ज, 76 गाड्या रद्द)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement