Holi Tragedy in Madhya Pradesh: महाकाल मंदिराच्या गर्भगृहात 'भस्म आरती' दरम्यान आग्नीतांडव; पुजाऱ्यांसह 13 जण जखमी (Watch Video)

उज्जैनच्या महाकाल मंदिरात सकाळी आरतीदरम्यान, मोठी दुर्घटना घडली. भस्म आरतीच्या वेळी गुलाल लावला जात होता. त्या गुलालाचा आगीशी संबंध आल्याने आग भडकली. आग इतकी मोठी होती की, या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत.

Photo Credit -Twitter

Holi Tragedy in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन येथील महाकाल मंदिराला आज, २५ मार्च रोजी भीषण आगीटी घटना घडली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, महाकाल(Mahakal) मंदिराच्या गर्भगृहात आग लागल्याने पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले. भस्म आरतीच्या वेळी आग (Fire)लागली. ही घटना घडली तेव्हा मंदिरात उपस्थितांना गुलाल लावला जात होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुलालाचा आगीशी संबंध आल्याने आग भडकली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(हेही वाचा:Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये धामपूर शहरात होळी उत्सवादरम्यान मुस्लिम कुटुंबाचा छळ; जबरदस्तीने रंग लावतानाचा व्हिडिओ व्हायरल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now