Cloud Burst In Mandi: हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने 51 लोक अडकले; एनडीआरएफने नागरिकांना बाचवले
हिमाचल प्रदेशात ढग फुटी झाल्याने ५१ नागरिक अडकले. NDRF च्या मदतीने लोकांना अपघातग्रस्त स्थळावरून सुखरुप बाहेर काढले.
Cloud Burst In Mandi: गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहे. या घटनेत अनेक नागरिकांनी प्राण गामावले आहे. काल भुस्खलनामुळे सात इमारती कोसळल्या परिणामी अनेक नागरिक ढीगाऱ्या खाली अडकले. दरम्यान हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील शेहनु गौनी आणि खोलानाला गावत ढग फुटल्याची घटना घडली. या घटनेत 51 नागरिक अडकले होते. ही माहिती नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांना देताच घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या आत बचावकार्यांनी 51 लोकांना वाचवले. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)