Weather Forecast: 'या' राज्यात उष्णतेची लाट उसळणार, भारतीय हवामान विभागाने दिले अपडेट, जाणून घ्या

भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला होता.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Weather Forecast: भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला होता. त्यात भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि वायव्य भागात उष्णतेची लाट उसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने म्हटले आहे की, 14 आणि 15 मे रोजी कोकणात आणि आजूबाजूच्या परिसरात उष्णतेची लाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 ते 18 मे दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये, 17 आणि 18 मे रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार आणि 16 ते 18 मे रोजी उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी उष्णतेची लाट होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा- मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now