Centre Approve Nasal Vaccine: भारत सरकारने दिली अनुनासिक लसीला मान्यता; प्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये होणार उपलब्ध

आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश केला जाणार असल्याचं अधिकृत स्रोताने सांगितलं आहे.

Nasal Vaccine (PC - Representational PTI )

Centre Approve Nasal Vaccine: भारत सरकारने अनुनासिक लसीला मान्यता दिली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाणार असून खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश केला जाणार असल्याचं अधिकृत स्रोताने सांगितलं आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील परिस्थिती पाहता यावेळी भारत सरकार आधीच अलर्ट मोडवर आले आहे. बुधवारपासून केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दुसरीकडे, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नवीन अनुनासिक कोरोना लसीबाबत माहिती दिली. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आज तज्ञांच्या समितीनेही नाकातील लसीला मंजुरी दिली. (हेही वाचा - Covid-19 BF.7 Variant: कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर IMA ने जारी केली अॅडव्हायजरी; देशवासियांना दिला 'हा' सल्ला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)