PIB Fact Check: सरकार व्हाट्सएप आणि फोन कॉल्सवर नवीन संचार नियमानुसार लक्ष ठेवणार? काय आहे या व्हायरल पोस्टमागील सत्य, जाणून घ्या
सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या फोटोच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि फोन कॉल्सवर भारत सरकारच्या 'नवीन कम्युनिकेशन नियमांनुसार' नजर ठेवली जाईल, असा गैरसमज पसरवला जात आहे.
PIB Fact Check: सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला आहे की, नवीन संप्रेषण नियमांनुसार भारत सरकार आता इंटरनेट वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटावर लक्ष ठेवणार आहे. हा दावा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सरकार व्हाट्सएप आणि फोन कॉल्सवर नवीन संचार नियमानुसार लक्ष ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या फोटोच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि फोन कॉल्सवर भारत सरकारच्या 'नवीन कम्युनिकेशन नियमांनुसार' नजर ठेवली जाईल, असा गैरसमज पसरवला जात आहे. भारत सरकारने असे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत. अशी कोणतीही फेक माहिती शेअर करू नका, असं आवाहन पीआयबीने केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement