Ganga Aarti in Varanasi: वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत पार पडली गंगा आरती (Watch Video)
त्यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. पंतप्रधान मोदी पाचव्यांदा गंगा आरतीत सहभागी. यावेळी दशाश्वमेध घाट दिव्यांनी उजळला होता.
Ganga Aarti in Varanasi: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वाराणसीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. पंतप्रधान मोदी पाचव्यांदा गंगा आरतीत सहभागी झाले. यावेळी दशाश्वमेध घाट दिव्यांनी उजळला होता. त्यांनी 15 मिनिटे गंगेची पूजा केली. यानंतर आरती पाहिली. यावेळी दशाश्वमेध घाटाचे दृश्य पाहण्यासारखे होते. प्रसिद्ध ज्योतिषी पं. चंद्रमौली उपाध्याय आणि नऊ अर्चकांनी पंतप्रधान मोदींनकडून गंगा मातेची पूजा केली. यावेळी 18 मुली रिद्धी-सिद्धी रूपात उपस्थित होत्या. तसेच 10 क्विंटल फुलांनी घाट सजवण्यात आला होता. गंगा आरतीनंतर पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रसाद म्हणून रुद्राक्षाची जपमाळ आणि लाल पेढा देण्यात आला. (हेही वाचा: PM Modi in Varanasi: विजयानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा काशी विश्वनाथ धामला पोहोचले, विधीपूर्वक केली भगवान भोलेनाथांची पूजा)
Watch Video-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)