Ganga Aarti in Varanasi: वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत पार पडली गंगा आरती (Watch Video)

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वाराणसीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. पंतप्रधान मोदी पाचव्यांदा गंगा आरतीत सहभागी. यावेळी दशाश्वमेध घाट दिव्यांनी उजळला होता.

Ganga Aarti in Varanasi: वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत पार पडली गंगा आरती (Watch Video)
Ganga Aarti in Varanasi

Ganga Aarti in Varanasi: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वाराणसीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. पंतप्रधान मोदी पाचव्यांदा गंगा आरतीत सहभागी झाले. यावेळी दशाश्वमेध घाट दिव्यांनी उजळला होता. त्यांनी 15 मिनिटे गंगेची पूजा केली. यानंतर आरती पाहिली. यावेळी दशाश्वमेध घाटाचे दृश्य पाहण्यासारखे होते. प्रसिद्ध ज्योतिषी पं. चंद्रमौली उपाध्याय आणि नऊ अर्चकांनी पंतप्रधान मोदींनकडून गंगा मातेची पूजा केली. यावेळी 18 मुली रिद्धी-सिद्धी रूपात उपस्थित होत्या. तसेच 10 क्विंटल फुलांनी घाट सजवण्यात आला होता. गंगा आरतीनंतर पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रसाद म्हणून रुद्राक्षाची जपमाळ आणि लाल पेढा देण्यात आला. (हेही वाचा: PM Modi in Varanasi: विजयानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा काशी विश्वनाथ धामला पोहोचले, विधीपूर्वक केली भगवान भोलेनाथांची पूजा)

Watch Video-

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 11:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).