Full Emergency At Delhi Airport: दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित; FedEx विमान पक्ष्याला धडकल्यानंतर घेण्यात आला निर्णय
दुबईला जाणाऱ्या FedEx विमानाला उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याने धडक दिली. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
Full Eemergency At Delhi Airport: दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुबईला जाणाऱ्या FedEx विमानाला उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याने धडक दिली. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत पक्ष्यांने विमानाला धडक दिली. विमानात किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)