S Venkitaramanan Passes Away: RBI चे माजी गव्हर्नर एस वेंकटरामनन यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली गिरिजा आणि सुधा असा परिवार आहे.

RBI (Photo Credits: PTI)

S Venkitaramanan Passes Away: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. वेंकटरामनन हे RBI चे 18 वे गव्हर्नर होते. त्यांनी 1990 ते 1992 पर्यंत त्यांनी गव्हर्नर म्हणून पद भूषवले होते. 1985 ते 1989 या काळात त्यांनी वित्त मंत्रालयात वित्त सचिव म्हणूनही काम केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली गिरिजा आणि सुधा असा परिवार आहे. त्यांची मुलगी गिरिजा वैद्यनाथनक या तामिळनाडूच्या माजी मुख्य सचिव होत्या. (हेही वाचा - HC On Blank Cheque: कोऱ्या धनादेशाबाबत केरळ हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण, घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)