Footbridge Collapsed in J&K: उधमपूरमध्ये फूटओव्हर ब्रिज कोसळला, 20 हून अधिक जण जखमी; बचाव कार्य सुरु

पूल कोसळल्याने गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे बैसाखीच्या विशेष मुहूर्तावर येथे भाविकांची गर्दी झाली होती.

Footbridge Collapsed in J&K (PC - ANI)

Footbridge Collapsed in J&K: जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. उधमपूरच्या चेनानी ब्लॉकमधील बैन गावातील बेनी संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान फूटब्रिज कोसळला. या अपघातात अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू आहे. पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. उधमपूरचे एसएसपी डॉ विनोद यांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. उधमपूरमधील बेनी संगम येथे बैसाखी जत्रेदरम्यान देविकावरील पूल कोसळला. पूल कोसळल्याने गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे बैसाखीच्या विशेष मुहूर्तावर येथे भाविकांची गर्दी झाली होती. याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. (हेही वाचा - Mann Ki Baat 100 Episodes: 'मन की बात'च्या 100 वा भागानिमित्त मुंबईतील 22 हून अधिक मदरशांमध्ये करण्यात येणार स्क्रीनिंग)