Uttarakhand Forest Fire: उत्तराखंडच्या नैनिताल हिल्समध्ये नीम करोली बाबा आश्रमाजवळ आग (Watch Video)
जवळच पाइनची जंगले आहेत. मात्र, टेकडीवर आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली.
Uttarakhand Forest Fire: नैनितालच्या कैंची धाम मंदिराजवळ मंगळवारी जंगलाला आग (Fire) लागली. कैंची मंदिरासमोरील हरतापा जंगलाला लागून असलेल्या नाप जमिनीवर मंगळवारी सायंकाळी चार वाजता अचानक आग लागली. जोराच्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. जवळच पाइनची जंगले आहेत. मात्र, टेकडीवर आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वन बीट अधिकारी प्रेम यांनी सांगितले की, हरतापाला लागून असलेल्या वन टेकडीवरील काही जमिनीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळ गाठून आग जंगलात पसरण्यापूर्वीच विझवली. ज्या ठिकाणी आग लागली ती जागा कैंची मंदिरापासून दूर असल्याचे त्यांनी सांगितले.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)