Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा परिसरात आग, कुलिंगचे काम सुरु

दिल्लीतील शाहदरा परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी आले.

Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा परिसरात आग, कुलिंगचे काम सुरु
FIre in Delhi PC ANI
Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी आले. आग विझवण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दिल्ली पोलिसांना या घटनेची नोंद घेतली आहे. आगीमुळे परिसरात हाहाकार माजला आहे. धुरांचे लोट परिसरात पसरत आहे. शाहदरा येथील डीसीपीं सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, "आम्हाला गीता कॉलनी पोलिस स्टेशनला सकाळी साडेपाच वाजता एका घरात मोठी आग लागल्याचा फोन आला. त्यानुसार स्थानिक पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. 9 लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले."( हेही वाचा- डोंबिवलीच्या पलावा सिटीतील इमारतीला भीषण आग, रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2024 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).