Rahul Gandhi च्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणावर दिल्लीत FIR दाखल, परदेशी आणि भारतीय नागरिकांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आरोप

केंब्रिज विद्यापीठात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडून आलेल्या सरकारबद्दल राहुल गांधी नकारात्मक बोलल्याचा आरोप वकील रवींद्र गुप्ता यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी कमी होत नाहीत. एकीकडे पाटणाच्या न्यायालयाने 25 एप्रिलला मानहानीच्या खटल्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी, आता दिल्लीच्या वकिलाने केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारीला दिलेल्या भाषणाबाबत खटला दाखल केला आहे. दिल्लीतील तीस हजारी पोलिस चौकीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंब्रिज विद्यापीठात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडून आलेल्या सरकारबद्दल राहुल गांधी नकारात्मक बोलल्याचा आरोप वकील रवींद्र गुप्ता यांनी केला. राहुल यांनी परदेशी नागरिक आणि भारतातील नागरिकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही वकिलाने केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)