Delhi Fire: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये भीषण आग, 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगीत 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Delhi Fire: दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील के-ब्लॉकमध्ये असलेल्या झोपडपट्टीला रविवारी सकाळी 10 वाजता अचानक आग लागली. आगीत 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक घाईघाईने झोपडपट्टीतून सामान बाहेर काढण्यात गुंतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या)
#WATCH | Fire breaks out in slums in Delhi's Jahangirpuri area. Fire tenders are present at the spot. More details are awaited.
(Source: Delhi Fire Service) pic.twitter.com/tZRdyUItbJ
— ANI (@ANI) June 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 12:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

