Telangana: सेल्फी काढताना तोल जाऊन पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू, तेलंगणातील घटना (See Pics and Video)
तेलंगणातील करीमनगर येथे एक दुःखद घटना घडली. सेल्फी काढताना तोल जाऊन पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात शोककळा पसरील आहे.
Telangana: विजय कुमार हे त्यांची मुलगी सैनित्या, मुलगा विक्रांत आणि पत्नीसोबत तलावाच्या शेजारी फेरफटका मारत आले होते. त्या दरम्यान मुलगी सैनित्या हिला सेल्फी(selfie) काढण्याच मोह झाला. त्यात तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तिल्या बुडलेले(Drowning) पाहून विजय कुमार यांनी पाण्यात उडी घेतली. त्यांच्या मागोमाग मुलगा विक्रांतनेही पाण्यात उडी मारली. त्यावेळी तेथे असलेल्या शंकर या मच्छिमाराने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यात मच्छीमाराने सैनित्या आणि विक्रांत वाचवले. मात्र, वडिलांचा मृत्यू (Father Dies)झाला.
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)