Delhi Fire: दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरतीला कारखान्याला आग, तीन जणांचा मृत्यू
दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.
Delhi Fire: दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. एका पाइपलाइनमध्ये गॅस गळती झाल्यामुळे कारखान्याला आग पसरली ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि परिणामी स्फोट झाला. श्याम, राम सिंग आणि बीरपाल अशी मृतांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3.35 वाजता आग लागली. या आगीत काही लोक अडकले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. अग्निशनम दलालाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- मणिपूरमधील दोन जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)