Naxal Encounter in Bijapur: विजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; 6 नक्षलवादी ठार
या चकमकीत आतापर्यंत किमान 6 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. पेडियाच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची बातमी सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीनंतर दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यातील जवानांनी संयुक्त कारवाई केली.
Naxal Encounter in Bijapur: छत्तीसगडमधील विजापूर (Bijapur) जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील गंगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिडिया जंगलात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत किमान 6 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. पेडियाच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची बातमी सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीनंतर दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यातील जवानांनी संयुक्त कारवाई केली. डीआरजी आणि एसटीएफसह सीआरपीएफच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)