Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऑनलाईन परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची शक्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षेत जवळपास ३५० विद्यार्थी गैरपक्रार करताना आढळून आले. यावेळी 'स्क्रीनशॉट' काढून परीक्षा देताना ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आले असून त्यांच्यावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठामार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षेत जवळपास ३५० विद्यार्थी गैरपक्रार करताना आढळून आले. यावेळी 'स्क्रीनशॉट' काढून परीक्षा देताना ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आले असून त्यांच्यावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठामार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरुपाची प्रश्र्नपत्रिका सोडवायची असते. यात गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून 'प्रॉक्टर्ड' या प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, काही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार करताना सापडले आहेत. विद्यापीठाच्या २२४ अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होत असून, साधारण ६ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, संगणक यापैकी कोणत्याही साधनांचा वापर करून परीक्षा देण्याची मुभा आहे. मात्र, याचाच गैरफायदा विद्यार्थी घेत असल्याचे आढळून आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now