QS World University Ranking: भारतामधील IIT Bombay आणि IIT Delhi चा जगातील टॉप-150 विद्यापीठांच्या यादीत समावेश; MIT पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर
रँकिंग यादीनुसार, भारतातील आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्लीचा जगभरातील टॉप-150 विद्यापीठांमध्ये समावेश आहे. आयआयटी बॉम्बेने गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करत 118 वे स्थान मिळविले आहे.
QS World University Ranking: जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी लावणारी संस्था क्यूएस वर्ल्डने, क्यूएस जागतिक क्रमवारी 2025 प्रसिद्ध केली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. त्यानंतर इम्पीरियल कॉलेज लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पुढे पहिल्या दहांमध्ये हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, इटीएच झुरिच, झुरिच राष्ट्रीय विद्यापीठ, युसीएल आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) चा समावेश होतो.
भारतीय विद्यापीठांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. रँकिंग यादीनुसार, भारतातील आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्लीचा जगभरातील टॉप-150 विद्यापीठांमध्ये समावेश आहे. आयआयटी बॉम्बेने गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करत 118 वे स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे आयआयटी दिल्ली यंदा 150 व्या स्थानावर पोहोचले आहे. आयआयएससीच्या मानांकनातही यंदा वाढ झाली आहे. आयआयएससीला 211 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी खरगपूर 222 व्या, आयआयटी मद्रास 227 व्या आणि आयआयटी कानपूरने 263 वे स्थान मिळविले आहे. या यादीत दिल्ली विद्यापीठाचाही समावेश करण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठाने 328 वे स्थान मिळवले आहे, त्यानंतर आयआयटी रुरकी 335, आयआयटी गुवाहाटी 344 आणि अण्णा विद्यापीठ 383 व्या स्थानावर आहे. याशिवाय आयआयटी इंदूरने 477 वा, आयआयटी बीएचयूने 531 वा आणि जेएनयूने 580 वा क्रमांक मिळविला आहे. (हेही वाचा: Internship Opportunity For Students: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी; जाणून घ्या सविस्तर)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)