Maharashtra Board 10th Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज नाही; विद्यार्थी, पालकांचे लक्ष निकालाच्या तारखेकडे

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल देखील अपेक्षित वेळेआधी जाहीर होईल अशी आस विद्यार्थी, पालकांना लागली आहे. दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सकडून 15 जूनला दहावीचा निकाल लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र राज्य शिक्षणमंडळाने आज 15 जून दिवशी निकाल जाहीर होणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. लवकरच अधिकृत निकालाची तारीख जाहीर करून तो प्रसिद्ध केला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)