Lay Off: गुगल समर्थित Adda247 ने कोणतीही पूर्वसूचना न देता 300 लोकांना कामावरून काढले- Reports

2016 मध्ये अनिल नगर आणि सौरभ बन्सल यांनी स्थापन केलेले, Adda247 हे टियर 2 आणि 3 शहरातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करते.

Layoffs (PC - Pixabay)

गुगल समर्थित एडटेक प्लॅटफॉर्म Adda247 ने विविध क्षेत्रातील सुमारे 250-300 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये शनिवारी याबाबत माहिती मिळाली. Entrackr ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, स्टडीआयक्यूमधून (StudyIQ) सुमारे 100 ते 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. स्टडीआयक्यू हे एक UPSC-केंद्रित एडटेक प्लॅटफॉर्म आहे जे कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये सुमारे $20 दशलक्ष मध्ये विकत घेतले होते. सुमारे 150 कर्मचार्‍यांना सेल्स आणि कंटेंटसारख्या प्रमुख वर्टिकलमध्ये कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनीतील काही वर्षांतील ही पहिलीच टाळेबंदी आहे. अहवालानुसार, कामावरून काढलेल्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता राजीनामा देण्यास सांगण्यात आले. 2016 मध्ये अनिल नगर आणि सौरभ बन्सल यांनी स्थापन केलेले, Adda247 हे टियर 2 आणि 3 शहरातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)