Ram Temple Construction: राम मंदिराचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार; राम मंदिर निर्माण समितीची माहिती
अयोध्येतील संपूर्ण राम मंदिर संकुलाचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी ही माहिती दिली.
Ram Temple Construction: 'मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम सुरू होईल', असे नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार,'आम्ही या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस दुसरा मजला आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण मंदिर परिसर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे', असे ते पुढे म्हणाले.मंदिरात बसवल्या जाणाऱ्या मूर्ती राजस्थानमधील मकराना संगमरवरीवर कोरल्या जाणार आहेत. या कामासाठी ट्रस्टने चार शिल्पकारांची निवड करण्यासाठी निविदा काढली आहे.यावर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर आतापर्यंत 1.75 कोटीहून अधिक भाविकांनी राम मंदिराला भेट दिली आहे.
पोस्ट पहा-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement