Rahul Gandhi: संविधान हातात घेऊन राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ, भाजपच्या खासदारांनी दिला 'जय श्री राम'चा नारा
मात्र, नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली आणि रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांनी नव्या संसदेतील लोकसभेच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. राहुल गांधी शपथ घेण्यासाठी जात असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. राहुल गांधी शपथ घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी हातात संविधान घेत उपस्थित खासदारांना दाखवलं. त्यांच्या या कृतीनंतर के. सी. वेणुगोपाल, अखिलेश यादव आदींनी उभं राहून बाकं वाजवली. राहुल गांधी शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करण्यासाठी जात असताना सभागृहात उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. तुम्हाला सांगतो, यावेळी राहुल गांधींनी यूपीमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाडची जागा जिंकली आहे. मात्र, नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली आणि रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा निर्णय घेतला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)