Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकात काँग्रेसवर निशाणा साधताना केला The Kerala Story चित्रपटाचा उल्लेख; म्हणाले, 'काँग्रेस चित्रपटाला विरोध करून दहशतवादी प्रवृत्तींसोबत उभे आहे', Watch Video
दहशतवादावर कारवाई झाली की काँग्रेसच्या पोटात दुखू लागते, असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले.
Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटकातील बल्लारी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर पोहोचले. येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, हा चित्रपट दहशतवादी कारस्थानांवर बनवण्यात आला आहे. यातून दहशतवादाचा भयानक आणि खरा चेहरा समोर आला आहे. आता काँग्रेस दहशतवादावर बनलेल्या या चित्रपटाला विरोध करत आहे. ते दहशतवादी प्रवृत्तींच्या पाठीशी उभे आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेसाठी दहशतवादाचा बचाव केला आहे. कर्नाटकला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिला आहे. दहशतवादावर कारवाई झाली की काँग्रेसच्या पोटात दुखू लागते, असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील मुरैनात अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)