Accident Video: आरएस पुरममध्ये भरधाव कारने दिली महिलेला धडक, भयावह दृश्य कॅमेरात कैद
आरएस पुरम येथील लाईट हाऊस रोडवर एका महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.
Accident Video: तमिळनाडू येथील आरएस पुरम येथील लाईट हाऊस रोडवर एका महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. लीलावती असं या महिलेचे नाव आहे. मंगळवारी केनेडी थिएटर परिसरात रस्त्याने जात असताना मागून एक भरधाव कार आली आणि थेट महिलेला जोरदार धडक दिली. घटनास्थळी स्थानिकांनी महिलेला वाचवले. उपचारासाठी तीला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले.
कोईम्बतूर येथील रहिवासी असलेली लीलावती कामावर जात असताना त्यांना एका वेगवान वाहनाने धडक दिल्याची तक्रार पोलिसांत केली. पोलिसांनी या घटनेअंतर्गत वाहन चालकावर गुन्हा दाखल करून घेतला. वाहन चालक उत्तम कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सक्रियपणे तपास करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)