Lucknow Video: लखनऊ येथील उच्चभ्रू सोसायटीत होळी खेळताना दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सोसायटीत होळीचा सण साजरा करत असताना दोन गटात हाणामारी झाली आहे.

Lucknow Video PC TWITTER

Lucknow Video: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सोसायटीत होळीचा सण साजरा करत असताना दोन गटात हाणामारी झाली आहे. होळी खेळत असताना एका कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली.या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे दोघांमध्ये भांडण आणि शिवीगाळ करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडली आहे. गोमती नगर येथील समिट बिल्डिंगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. ही इमारत अशा मारामारीसाठी प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण मद्यधुंद तरुण या इमारतीत रोज भांडत राहतात. (हेही वाचा- प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहान )

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement