West Bengal Shocker: पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सिटीस्कॅन ऑपरेटर पोलिसांच्या ताब्यात

एका अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या वेळीस सीटी स्कॅन रुममध्ये विनयभंग करण्यात आला. ही घटना हावडा रुग्णालयातील आहे. कुटुंबियाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Molestation | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

West Bengal Shocker: पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या वेळीस सीटी स्कॅन रुममध्ये विनयभंग करण्यात आला. ही घटना हावडा रुग्णालयातील आहे. कुटुंबियाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या सीटी स्कॅन विभागातील तात्पुरती कर्मचारी यांने १३ वर्षीय मुलीचा वियनभंग केला. व्हिडिओत मुलीने सांगितले की, रात्रीच्या वेळीस कर्मचाऱ्यांने अयोग्य स्पर्श केला. संतापलेल्या नातेवाईंकांनी रुग्णालयात बाहेर आंदोलन केले. आरोपीला मारहाण देखील केली. सीटी स्कॅन झाल्यानंतर मुलगी रडत रडत बाहेर आणि त्यानतंर ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा-  उत्तर प्रदेशात दोन मैत्रिणींच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरणाचे प्रकरण आले समोर)

हावडा रुग्णालयातील व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)