Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांना पुन्हा समन्स

सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

Manish Sisodia | (Photo Credits: Facebook)

Delhi Liquor Scam: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. शनिवारी मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, रविवारी त्यांना सीबीआयने मुख्यालयात बोलावले आहे. हे राष्ट्रीय राजधानीसाठी उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. सीबीआयने मला उद्या पुन्हा बोलावले आहे, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. त्यांनी ईडी आणि सीबीआयची संपूर्ण शक्ती माझ्याविरोधात वापरली आहे. अधिकार्‍यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या बँक लॉकर्सची झडती घेतली पण माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही. मी दिल्लीत मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यांना मला थांबवायचे आहे. तपासात मी नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहीन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)