Bulandshahr Accident: बुलंदशहरमध्ये कार कालव्यात पडली, 3 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता
कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. सीएम योगी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे.
Bulandshahr Accident: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामधील जहांगीर पूर पोलीस स्टेशन परिसरात कार कालव्यात पडल्याने 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. सीएम योगी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. एडीएम प्रशांत कुमार यांनी सांगितले की, कारमध्ये एकूण 8 लोक होते आणि ते बुलंदशहरच्या शेरपूर गावातून अलीगढ पिसावा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांची कार अनियंत्रित होऊन कपना कालव्यात उलटली, त्यामुळे हा अपघात झाला. आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित 3 जणांचा शोध सुरू आहे. एसडीआरएफ आणि इतर पथके शोधकार्य सुरु आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)