Bull Attacked: भटक्या बैलाचा रामलीला जत्रेत महिला आणि चिमुकल्यावर हल्ला, दोघेही जखमी

उत्तर प्रदेशात हापूर गावात रामलीला जत्रेत एका भटक्या बैलाने दोघांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Bull attack

Bull Attacked: उत्तर प्रदेशात हापूर (Hapur) गावात रामलीला जत्रेत एका भटक्या बैलाने दोघांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भटक्या बैलाने मोठा गोंधळ माजवला, जत्रेत चेंगराचेंगरी झाली. महिला आणि लहान मुलावर हल्ला केला. मुलाला स्थानिकांने वाचवले, परंतु महिलेवर हल्ला केला, या घटनेत दोघेही जखमी झाले आहे. लाउडस्पीकरच्या आवाजामुळे बैल अस्वस्थ झाला त्यामुळे जत्रेत येऊन धिंगाणा घातला. घटनेची माहिती मिळताच वन्य विभागातून पथक पाठवण्यात आले, बैलाला पकडून गोठ्यात बांधण्यात आले. रविवार सुट्टीच्या दिवशी लोकांनी जत्रेत फार गर्दी केली होती. सद्या दोघांवर रुग्णालयात उपचार घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now