Brother Kills Sister After First Period: उल्हासनगरमध्ये रक्तस्त्राव लैंगिक संबंधामुळे झाल्याच्या संशयामुळे लहान बहिणीची हत्या

उल्हासनगरमध्ये मोठ्या भावाने आपल्या लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या निर्दयी भावाला अटक केली आहे. 12 वर्षीय मयत मुलगी उल्हासनगरच्या शांतीनगर भागात तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Brother Kills Sister After First Period: उल्हासनगरमध्ये मोठ्या भावाने आपल्या लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या निर्दयी भावाला अटक केली आहे. 12 वर्षीय मयत मुलगी उल्हासनगरच्या शांतीनगर भागात तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. त्यांचे आई-वडील गावात राहतात. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा मासिक पाळी आली. मात्र हे पाहून तिच्या वहिनीने पतीला चुकीची माहिती दिली. मुलीच्या वहिनीने पतीला सांगितले की, तुझ्या बहिणीचे अफेअर आहे. आणि हा रक्तस्त्राव लैंगिक संबंधामुळे होत आहे. त्यामुळे चिडलेल्या मुलीच्या मोठ्या भावाने बहिणीला तीन दिवस मारहाण केली. पिडीतेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे मुलीला खूप दुखापत झाली, त्यामुळे 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्यांनी स्वत: मुलीला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

जाणून घ्या, संपूर्ण माहिती 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement