Murder Caught on Camera in Gurugram: भररस्त्यात गोळी झाडून बाऊन्सची केली हत्या, दोघांवर गुन्हा दाखल
गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका २७ वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली.
Murder Caught on Camera in Gurugram: गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका 27 वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली. हल्लेखोर झोमॅटो आणि बिंल्कीट या कंपनीचे गणवेश परिधान करून आले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. अनुज असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनूजच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी आणि तपासणी करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. गोळीबारच्या घटनेनंतर अनुजला जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- पुण्यात वाहनांची तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण, घटना CCTV कैद)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)