Chandigarh Bomb Threat: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू (Video)
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला आज, गुरुवारी, २२ मे रोजी ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामुळे सुरक्षा दलांकडून तात्पुरती तपासणी करण्यात आली. सुदैवाने तेथे सरव सुरळीत सुरू आहे.
Chandigarh Bomb Threat: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला आज, गुरुवार, २२ मे रोजी ईमेलद्वारे बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. ज्यामुळे काही काळ तेथे घबराटीचे वातावरण होते. सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले. त्यांना तपासात काही सापडले नाही. या काळात कोर्टरूममध्ये सर्वांना प्रवेश स्थगित करण्यात आला होता. पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने परिसराची सखोल तपासणी केली. वकिलांसाठी कोर्टरूमचा प्रवेश तात्पुरता थांबवण्यात आला होता. अहवालानुसार, जवळजवळ दोन तासांच्या तपासणीनंतर, अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कक्ष मोकळा केला आणि सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)