Blast on Udaipur Ahmedabad Railway Track: उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर स्फोट, घटनास्थळी सापडले स्फोटक; 13 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

Blast on Railway Track (PC - @Dainikbhaskar Twitter)

Blast on Udaipur Ahmedabad Railway Track: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री झालेल्या स्फोटाने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या प्रयत्नात प्रथमदर्शनी स्फोट करण्यात आला असून घटनास्थळी बारूदही सापडली आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे

स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या नवीन मार्गावर मोठा अपघात टळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा ओढा रेल्वे पुलाजवळ साळुंबर मार्गावर ही घटना घडली. येथे काल रात्री 10 वाजता गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. तिथली अवस्था पाहून सगळेच थक्क झाले. रेल्वे रुळावर बारूद पडल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पूल उडवण्याचा कट असल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)