BJP Leader Neeraja Reddy Dies: तेलंगणामध्ये भाजप नेत्या नीरजा रेड्डी यांचा रस्ता अपघातात मृत्यू

माजी आमदार आणि कुर्नूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. रेड्डी हे राज्यातील एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून आमदार म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2011 मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि त्या राजकारणापासून दुरावल्या.

BJP leader Neerja Reddy Car (PC - ANI/Twitter)

BJP Leader Neeraja Reddy Dies: 16 एप्रिल रोजी माजी आमदार आणि कुर्नूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्या हैदराबादहून कुरनूलला येत होत्या, तेव्हा तेलंगणातील बीचुपल्ली येथे टायर फुटल्याने त्यांची कार उलटली. रेड्डी यांचा श्री चक्र हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रेड्डी हे राज्यातील एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून आमदार म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2011 मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि त्या राजकारणापासून दुरावल्या. नंतर 2019 मध्ये त्या वायएसआरसीपीमध्ये सामील झाल्या. पण नंतर, त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा - Kargil War Unexploded Bomb: कारगिल युद्धात न फुटलेल्या बॉम्बचा स्फोट; एक चिमुलला ठार, दोन तरुण जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement