Birbhum Blast: पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील कोळसा खाणीत स्फोट, 7 कामगार ठार

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात 5 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा अपघात खैराशोल ब्लॉकच्या लोकपूर पोलीस ठाण्याच्या भादुलिया गावात घडला आहे. मृत कामगारांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Birbhum Blast

Birbhum Blast: पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात 5 ते 7  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा अपघात खैराशोल ब्लॉकच्या लोकपूर पोलीस ठाण्याच्या भादुलिया गावात घडला आहे. मृत कामगारांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात व्यस्त आहेत. प्रशासनाने वेगाने बचावकार्य सुरू केले आहे. हे देखील वाचा: रत्नागिरी रेल्वे स्टेशन पूलाचे छत निखळले? अतुल लोंढे पाटील यांच्याकडून व्हिडिओ शेअर

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील कोळसा खाणीत स्फोट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now