Bihar: बिहारमध्ये पोषण आहारातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video)

बिहारमधील अररिया येथे ७० शाळकरी मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या मुलांना शाळेत दिलेला पोषण आहार खाल्ल्याने बपे वाटत नव्हते.उलट्या आणि मळमळ होत होती.

Photo Credit - Twitter

Bihar : बिहारमधील अररिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना पोषण आहारातून(Mid-Day Meal) विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बाधित सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार (treatment )सुरू आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सर्व ७० मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची ही पहिलीच घटना नाही.  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देखील एक अशीच घटना घडली होती. त्यावेळी बिहारमधील सीतामढी येथील एका प्राथमिक शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना शाळेत शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली होती. त्यावेळी पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. (हेही वाचा:Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड

)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement