Arvind Kejriwal Arrest: अरविंद केजरीवाल राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर, सुनावणी सुरू; ईडीने मागितली 10 दिवसांची कोठडी

केजरीवाल यांच्यासोबत ईडीची टीम कोर्ट रूममध्ये पोहोचली आहे. याप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. ED ने न्यायालयाकडे 10 दिवसांची कस्टडी मागितली आहे.

Arvind Kejriwal appears in Rouse Avenue court (PC - X/ANI)

Arvind Kejriwal Arrest: ईडीच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले आहे. केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता आणि ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी हे उलटतपासणीसाठी कोर्ट रूममध्ये पोहोचले आहेत. केजरीवाल यांच्यासोबत ईडीची टीम कोर्ट रूममध्ये पोहोचली आहे. याप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. ED ने न्यायालयाकडे 10 दिवसांची कस्टडी मागितली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू, जोहेब हुसेन आणि नवीन मथा ईडीच्या वतीने हजर झाले आहेत. त्याचवेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हेही न्यायालयात पोहोचले आहेत. कोर्ट रूमच्या बाहेर उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मीडियाला आत जाण्यापासून रोखले. त्यावरून पत्रकार आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement