Anna Hazare on Arvind Kejriwal: 'केजरीवाल यांना त्यांच्या कृत्यांमुळेच अटक झाली'; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया (Watch Video)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रीया दिली आहे. अरविंद यांनी माझे कधीच ऐकले नाही. याचे मला दुःख आहे. त्यांना त्यांच्या कृत्यांमुळेच अटक झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Photo Credit - Twitter

Anna Hazare on Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या अटकेवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. अरविंदने माझे कधीच ऐकले नाही. मला याचे दुःख आहे. मी नेहमी दारू धोरण बंद करण्याबाबत बोलायचो, पण त्यांनी ते सुरू ठेवले. त्यांच्या या कृत्यामुळे आज त्यांना अटक करण्यात आली', असे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा : Arvind Kejriwal Was Spying On ED Officials: ईडी अधिकाऱ्यांची हेरगिरी करत होते अरविंद केजरीवाल; घरात सापडले पुरावे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement