Andhra Pradesh: कुर्नूल शहराजवळ तीन ट्रान्सजेंडर्सचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
कर्नूल शहराजवळ रविवारी तीन ट्रान्सजेंडर्सचा संशयास्पद मृतदेह आढळला.
Andhra Pradesh: कुर्नूल (Kurnool)शहराजवळ रविवारी तीन ट्रान्सजेंडर्सचा संशयास्पद मृतदेह(Transgender Death) आढळला. शहराजवळील गर्गेयापुरम येथील तलावात स्थानिक रहिवाशांना दोन मृतदेह आढळून आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना नंतर तलावाच्या बंधाऱ्यावर आणखी एक मृतदेह सापडला. मृतांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. (हेही वाचा:Afghanistan Flash Floods: मुसळधार पावसामुळे अफगानिस्तानमध्ये 50 जणांचा मृत्यू (Watch Video)) Andhra Pradesh,Kurnool,Kurnool Town,Transgender Death,Transgenders, आंध्र प्रदेश,कुर्नूल,कुर्नूल टाउन,ट्रान्सजेंडर मृत्यू,ट्रान्सजेंडर
मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नूलच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृताची ओळख आणि मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)