Winter Session Of Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत पार पडली सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशन (Winter Session Of Parliament) 4 ते 22 डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून त्याआधी आज संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत सर्वपक्षीय बैठक (All-party Meeting) झाली.

Parliament (PC -Wikimedia Commons)

Winter Session Of Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशन (Winter Session Of Parliament) 4 ते 22 डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून त्याआधी आज संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत सर्वपक्षीय बैठक (All-party Meeting) झाली. आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयके सुरळीतपणे मंजूर व्हावीत यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्याने कामकाजावर परिणाम झाला होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर केले होते. (हेही वाचा - Minority Student Scholarship Scam: केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीत मोठा घोटाळा; 25 लाख अर्जांपैकी 26 टक्के अर्ज बनावट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)