Varanasi: बेदम मारहाण करत सादूची केली हत्या, चार तरुणांवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका सादूची बेदम मारहाण करत हत्या केली. सादूने दारू पिण्यासाठी तरुणांकडे पैसे मागितले होते. यावरून सादू आणि तरुणांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. चार तरुणांनी मिळून सादूला मारहाण केली.त्याच्या डोक्यात दगड घातला.

Photo Credit- X

Varanasi:  उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका सादूची बेदम मारहाण करत हत्या केली. सादूने दारू पिण्यासाठी तरुणांकडे पैसे मागितले होते. यावरून सादू आणि तरुणांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. चार तरुणांनी मिळून सादूला मारहाण केली.त्याच्या डोक्यात दगड घातला. सादूला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आणि आरोपींना ताब्यात घेतले.  पप्पू असं हत्या झालेल्या सादूचे नाव होते. (हेही वाचा-  पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; गणपतीच्या दर्शनासाठी आले असताना घडली घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now