Delhi Cylinder Blast Video: बदरपूरमध्ये गॅस गळतीमुळे अपघात, एकामागून एक 20 सिलिंडरचा स्फोट, Watch Video

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

Fire प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit - X/ANI)

Delhi Cylinder Blast Video: दिल्लीतील बदरपूर (Badarpur) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, सुरुवातीला एका दुकानात आग लागली, ज्यामुळे आवारात साठवलेल्या अनेक एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गुरुवारी, 25 जानेवारी रोजी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्याने जीवितहानी टळली. स्फोटानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. आगीमुळे तिथे ठेवलेले 20 सिलिंडर एकापाठोपाठ एक फुटले आणि लोक स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. या घटनेमुळे मथुरा रोडवर बराच वेळ जाम झाला असून जवळपास दोन तास लोक जाममध्ये अडकून पडले होते. तसेच वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)