Abbas Ansari Gets Bail: आर्म्स लायसन्स प्रकरणात अब्बास अंसारी याला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शस्त्र परवाना प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अब्बासला जामीन मंजूर करण्यात आला.
Abbas Ansari Gets Bail: बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी (Abbas Ansari) याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्म्स लायसन्स प्रकरणी (arms license case) सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अंसारी याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. वास्तविक, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अब्बास अन्सारीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ज्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. (हेही वाचा:UttarPradesh: कारागृहातील कैद्यांवर आता 24 तास सीसीटीव्हीद्वारे लक्ष्य)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)